कऱ्हे गावाच्या जवळपास अनेक प्राचीन व प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. गावापासून केवळ ५ किलोमीटर अंतरावर भोंदेश्वर शिव मंदिर आहे. हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून परिसरातील लोकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे.
तसेच गावातच श्री चिंतामणी गणपती मंदिर व कमापीर बाबा दर्गा हीही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येतात.